Kareena Kapor Khan: 'टॉम अँड जेरी, बिर्याणी आणि बरंच काही', बेबोने चाहत्यांसोबत शेअर केल्या तिच्या आवडत्या गोष्टी

Kareena Kapor Khan: करीनाने तिच्या चाहत्यांशी इंस्टाग्रामवरील आस्क मी नाऊ या फिचरद्वारे संवाद साधला.
 करीना कपूर
Kareena Kapor Khanesakal
Updated on

Kareena Kapor Khan: बॉलिवूडची ग्लॅमगर्ल बेबो म्हणजेच करीना कपूरची (Kareena Kapor Khan) क्रेझ आजही कायम आहे. नुकताच तिचा क्रू हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस आला. तिचा हा सिनेमा चांगलाच गाजतोय. याचदरम्यान तिने तिच्या चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी तिने दिलेल्या उत्तरांनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.

करीनाने तिच्या चाहत्यांशी इंस्टाग्रामवरील आस्क मी नाऊ या फिचरद्वारे संवाद साधला. यावेळी तिच्या एका चाहत्याने तिला ती लहानपणी कोणतं कार्टून बघायची असा प्रश्न विचारला त्यावर करिनाने 'टॉम एन जेरी' कार्टूनचा फोटो शेअर केला आणि "टीम आणि जेह प्रमाणे मी सुद्धा टॉम एन जेरी बघायचे" असं उत्तर दिलं.

करिना कपूर
Kareena Kapor KhanKareena Kapor Khan social media

एका चाहत्याने तिला तिचं आवडीचं जेवण काय आहे असं विचारलं त्यावर तिने,"खूप मोठी लिस्ट आहे जसं कि पिझ्झा, खिचडी. कढी चावल, बिर्याणी आणि बरंच काही..." असं उत्तर दिलं.

करिना कपूर
Kareena Kapor KhanKareena Kapor Khan social media

तर एकाने तिला तू जेव्हा 'सोना कितना सोना है' हे गाणं गायलंस तेव्हा लोलोची (करिष्मा) रिअॅक्शन कशी होती? असा प्रश्न केला त्यावर तिने,"तिला खूप आवडलं. आतापर्यंत तिने तीनदा सिनेमा पाहिलाय असं उत्तर दिलं."

करिना कपूर
Kareena Kapor Khan Kareena Kapor Khan social media

इतकंच नाही तर करीनाने यावेळी तिच्या आगामी प्रोजेक्टबाबतही महत्त्वाचा खुलासा केला. करीनाच्या एका फॅनने तिला तिच्या आगामी फिल्मविषयी विचारलं. यावेळी तिने तिच्या आगामी फिल्ममधील लुकचा फोटो शेअर केला आणि ती लवकरच एका पोलीस अधिकाऱ्यांशी संबंधित सिनेमात दिसणार आहे असं म्हंटल. तिने शेअर केलेल्या फोटोवरून ती पुन्हा एकदा सिंघम अगेन सिनेमात दिसणार असल्याची चर्चा सगळीकडे रंगलीय. फोटोवरील लूकने तिने सगळ्यांचं मन जिंकलं आहे.

करिना कपूर
Kareena Kapor KhanKareena Kapor Khan social media

दरम्यान क्रू सिनेमात करिनाने साकारलेली भूमिका चांगलीच गाजलीये. तिच्या लूकने आणि तिच्यावर चित्रित झालेल्या गाण्यांनीही प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. नैना सिनेमातील तिच्या अदांवर प्रेक्षक फिदा झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com