Kartik Aaryan : "सत्यप्रेम की कथाच्या सेटवर.." खास शब्दांमध्ये कार्तिकने केलं समीर-जुईलीचं अभिनंदन ; रिसेप्शनच्या फोटोमधील अभिनेत्याच्या साधेपणाचं होतंय कौतुक

Kartik Aaryan Post For Sameer Vidwans : अभिनेता कार्तिक आर्यनने दिग्दर्शक समीर विद्वांस यांच्या लग्नाच्या रिसेप्शनचे फोटो शेअर करत त्यांना शुभेच्छा दिल्या.
Kartik aaryan & Sameer Vidwans
Kartik aaryan & Sameer VidwansEsakal

Sameer Vidwans & Juilee Sonalkar Wedding : मराठीबरोबर 'सत्यप्रेम की कथा' या सिनेमामुळे बॉलिवूडमध्येही स्वतःची ओळख निर्माण करणारे दिग्दर्शक समीर विद्वांस यांनी जुईली सोनाळकरशी काही दिवसांपूर्वी लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नाला 'चंदू चॅम्पियन' फेम कार्तिक आर्यनने हजेरी लावत त्यांचं अभिनंदन केलं.

कार्तिकची पोस्ट

सोशल मीडियावर कार्तिकने जुईली आणि समीर यांच्या लग्नाचे आणि रिसेप्शनचे खास फोटो शेअर करत त्यांचं अभिनंदन केलं. या फोटोमध्ये कार्तिकबरोबर 'सत्यप्रेम की कथा' सिनेमाच्या इतर टीमनेही हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं. अभिनेते गजाजी राव सुद्धा यावेळी हजेरी होते. कार्तिकने या फोटोंना "एक प्रेमाची गोष्ट जी अक्षरशः आमच्यासमोर सत्यप्रेम कि कथा सिनेमाच्या सेटवर फुलली. त्यांच्या सुंदर प्रवासाचा भाग असल्याचा मला खूप आनंद आहे. अभिनंदन समीर सर आणि जुईली." असं कॅप्शन दिलं आहे. समीर यांनी कार्तिकच्या फोटोवर कमेंट करत त्याचे आभार मानले.

कार्तिकने शेअर केलेले रिसेप्शनचे फोटो तर सगळ्यांना आवडलेच पण त्याबरोबरच त्याच्या साधेपणाचं अनेकांनी कौतुक केलं. कार्तिकने समीर आणि जुईली यांचं स्टेजवर जाऊन अभिनंदन केलं आणि त्यांच्याबरोबर सेल्फी काढलाच पण त्यानंतर त्याने समीर यांच्या कुटूंबाबरोबर बसून एकत्र जेवण केलं. सोशल मीडियावर त्याच्या या साधेपणाचं आणि नम्रपणाचं कौतुक होतंय.

Kartik aaryan & Sameer Vidwans
Kartik Aaryan : आणि आईने कार्तिकला सॅन्डलने मारलं ; कार्तिकच्या आईने सांगितली 'ती' आठवण

समीर-जुईलीचं लग्न

२९ जून २०२४ ला जुईली आणि समीर यांनी पारंपरिक मराठी पद्धतीने लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नाला मराठी सिनेविश्वातील अनेक नामवंत मंडळी उपस्थित होती. सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाचे फोटो चांगलेच चर्चेत होते.

सुपरहिट सिनेमात एकत्र काम

२०२३ मध्ये रिलीज झालेल्या 'सत्यप्रेम की कथा' या सिनेमासाठी समीर आणि कार्तिक यांनी एकत्र काम केलं होतं. या सिनेमापासूनच त्या दोघांची चांगली मैत्री झाली. नुकतंच या सिनेमाला एक वर्षं पूर्ण झालं त्या निमित्ताने कार्तिकने सोशल मीडियावर खास पोस्टही शेअर केली होती. कियारा अडवाणीचीही या सिनेमात मुख्य भूमिका होती. बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा सुपरहिट झाला होता. या सिनेमाने ११७.७ करोड रुपयांची कमाई केली होती.

Kartik aaryan & Sameer Vidwans
Kartik Aaryan : जेव्हा कार्तिक आर्यनने परीक्षेच्या पेपरमध्ये लिहिली 'प्यार का पंचनामा २' ची गोष्ट ; आईने केली पोलखोल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com