'लग्नानंतर होईलच प्रेम' मालिकेतील कश्मिरा कुलकर्णी हिने एका कॅम्पमधील अनुभव शेअर केला आहे.
यावेळी बोलताना तिने सांगितलं की, 'एका मुलाला खायला काही नसल्याने त्याने चक्क उंदीर खाल्ला'
'मग मी त्यानंतर ठरवलं की, आपण काहीतरी बनायचं. इतकं की आपण दुसऱ्याला मदत करु शकतो.
सध्या स्टार प्रवाहवरील लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. मालिकेतील जीवा, काव्या, नंदिनी, पार्थ यांचं पात्र प्रेक्षकांच्या मनामध्ये घर करुन आहे. हे चारही पात्र प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. अशातच आता पार्थबरोबर लग्न करण्यासाठी रम्या अनेक प्रयत्न करताना दिसते. काव्या आणि पार्थचं लग्न झाल्यानंतरही पार्थ प्रेमात पडावा यासाठी ती प्रयत्न करत असते. मालिकेत रम्याचं पात्र कश्मिरा कुलकर्णी ही अभिनेत्री साकारताना दिसत आहे. नुकतच तिने राजश्री मराठीला मुलाखत दिली. यावेळी तिने अनेक गोष्टी शेअर केल्यात.