
Marathi Entertainment News : ‘वामा – लढाई सन्मानाची’ या आगामी मराठी चित्रपटातील धमाकेदार गाणी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. काही दिवसांपूर्वीच गौतमी पाटीलचे ‘फायर ब्रिगेडला बोलवा’ हे धमाल गाणे प्रदर्शित झाले. या गाण्याला प्रेक्षकांची तुफान पसंती मिळत असतानाच चित्रपटातील ‘गुटूर गुटूर’ हे जबरदस्त आयटम साँग संगीतप्रेमींच्या भेटीला आले आहे.