Katrina Kaif : कतरीनाला आवडते शाकाहारी जेवण, विकीने सांगितले लग्नानंतर कतरीना सासरी कशी रमली

बॉलिवूडच्या प्रसिद्ध जोडप्यांपैकी एक जोडपे अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कतरीना कैफ हे आहेत. या दोघांनी २०२१ मध्ये लग्नगाठ बांधली. त्यानंतर आता कतरीना गरोदर असल्याची बातमीदेखील आहे.
Katrina Kaif like vegetarian meal says vicky kaushal
Katrina Kaif like vegetarian meal says vicky kaushalSakal

बॉलिवूडच्या प्रसिद्ध जोडप्यांपैकी एक जोडपे अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कतरीना कैफ हे आहेत. या दोघांनी २०२१ मध्ये लग्नगाठ बांधली. त्यानंतर आता कतरीना गरोदर असल्याची बातमीदेखील आहे.

अशातच विकीने कतरीनासोबत लग्न झाल्यापासून त्याच्या आयुष्यात झालेले बदल चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. मुलाखतीदरम्यान लग्नानंतर कतरीना सासरी कशी रमली आणि तिच्या काही चांगल्या सवयींबाबत सांगताना विकी म्हणाला, ‘‘मी मुंबईत माझे आई-बाबा आणि भाऊ यांच्यासोबत राहतो.

लग्नानंतर कतरीनाही वेगळी न राहता या कुटुंबात आली. माझ्या प्रिय पत्नीला शाकाहारी जेवणच जास्त आवडते. छोले भटुरे आणि इतरही पंजाबी पदार्थ तिला आवडतात. माझी आई तर खूप खूश आहे की, तिला टिंडे, बीन्स, सुरई या भाज्या आवडणारी सून मिळाली,’’ असे विकी कौशलने सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com