'छावा' चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांकडून सिनेमाचं भरभरून कौतूक करण्यात आलंय. या चित्रपटात विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात विकीनं दमदार अभिनय केला आहे. विकीचा महाराजांच्या रुपातील अंदाज पाहून प्रेक्षक भारावून गेले. विकीने केवळ छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली नाही तर ती भूमिका विकी जगला असल्याचं चित्रपटात पहायला मिळतय. दरम्यान विकीची पत्नी कतरिना कैफ हिने सुद्धा पोस्ट शेअर नवरोबांचं तोंडभरून कौतूक केलंय.