
Marathi Entertainment News : निर्माते व दिग्दर्शक नीरज पांडे यांनी हिंदी चित्रपटसृष्टीबरोबरच ओटीटी प्लॅटफाॅर्मसारख्या नव्या माध्यमामध्ये आपली चांगली ओळख निर्माण केली आहे. त्यांची निर्मिती असलेली आणि अभिनेता के. के. मेनन यांची प्रमुख भूमिका असलेली 'स्पेशल ऑप्स' ही वेबसिरीज चांगलीच लोकप्रिय ठरली होती. त्यामुळे त्याच्या दुसऱ्या भागाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात होते.