
लोकप्रिय रीलस्टार सुरज चव्हाण याचा ‘झापुक झुपूक’ हा चित्रपट २५ एप्रिल रोजी प्रदर्शित झालाय. 'बिग बॉस मराठी ५' जिंकल्यानंतर दिग्दर्शक केदार शिंदे यांनी त्याला चित्रपटाची ऑफर दिली आणि आज तो चित्रपट मोठ्या पडद्यावर दिसतोय. सुरजच्या चित्रपटाचं आणि अभिनयाचं समीक्षक कौतुक करत आहेत. प्रेक्षकांचा चित्रपटाला चांगला प्रतिसाद लाभलाय. मात्र त्याचे ट्रोलर्स जाणूनबुजून त्याला ट्रोल करत आहेत, असं केदार शिंदे म्हणालेत. त्यांनी सुरजचा चित्रपट फ्लॉप करायचा हे ट्रोलर्सचं आधीपासूनच ठरवलं होतं असंही सांगितलं.