

Aga Aga Sunbai Kay Mhanta Sasubai New Song Out
esakal
Marathi Entertainment News : मराठी संगीतप्रेमींना नेहमीच जुन्या, अजरामर गीतांची भुरळ पडलेली असते. काळ बदलतो, पिढ्या बदलतात, मात्र काही गाणी मात्र आपल्या भावनांशी कायमची नाळ जोडून ठेवतात. अशाच अजरामर गीतांना आजच्या काळात, आधुनिक मांडणीत तरीही मूळ आत्मा जपून, नव्या पद्धतीने प्रेक्षकांसमोर सादर करण्याचा एक वेगळाच प्रयोग ‘अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ या चित्रपटातून करण्यात आला आहे.