

kedar shinde
esakal
मराठी सिनेमाला एका वेगळ्या उंचीवर नेणारे, प्रेक्षकांची नस ओळखणारे लोकप्रिय मराठी दिग्दर्शक केदार शिंदे यांचा 'अगं अगं सुनबाई, काय म्हणता सासूबाई!' हा नवा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. त्यात अभिनेत्री प्रार्थना बेहरे सुनेच्या भूमिकेत आणि अभिनेत्री निर्मिती सावंत सासूच्या भूमिकेत दिसतायत. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळालाय. यानिमित्ताने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत केदार शिंदे यांनी त्यांच्या 'झापुक झुपूक' या चित्रपटाच्या फ्लॉप होण्यावर भाष्य केलंय. 'बिग बॉस मराठी ५' चा विजेता ठरल्यावर केदार शिंदे यांनी सूरजवर सिनेमा करण्याचं जाहीर केलेलं. मात्र हा चित्रपट चालला नाही. आता केदार शिंदे यांनी त्यावर आपलं मत मांडलंय.