आईने माझी ती डायरीचं जाळून टाकली... ख्रिश्चन मुलाशी लग्न करण्याला कीर्ती सुरेशच्या घरच्यांचा होता विरोध; म्हणाली-

Keerthy Suresh Love Story | Actress Reveals Family Opposition to Her Relationship With a Christian Man: लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेत्री कीर्ती सुरेश तिच्या 'अक्का' सीरिजमुले चर्चेत आहे. यानिमित्ताने तिने तिच्या आंतरधर्मीय लग्नाची गोष्ट सांगितलीये.
keerthy suresh

keerthy suresh

esakal

Updated on: 

साऊथ इंडस्ट्रीसोबतच बॉलिवूडच्या प्रेक्षकांमध्येही लोकप्रिय असणारी अभिनेत्री कीर्ती सुरेश तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखली जाते. तिच्या नुकत्याच आलेल्या 'अक्का' या सीरिजची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. आता या सिरीजनिमित्त दिलेल्या मुलाखतीत कीर्तीने तिच्या लग्नाची गोष्ट सांगितलीये. कीर्तीने आंतरधर्मीय विवाह केला आहे. तिने ख्रिश्चन असलेल्या अँटनी थट्टिल याच्याशी लग्न केलं. ती तब्बल १५ वर्ष त्याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होती. मात्र तिच्या प्रेमाला आणि लग्नाला तिच्या घरच्यांचा विरोध होता. कीर्तीची आई ज्येष्ठ अभिनेत्री मेनका यांना मुलीची डायरी वाचल्यानंतर तिच्या प्रेमाबद्दल समजलं होतं.

Loading content, please wait...