
सध्या सगळीकडे मराठी विरुद्ध हिंदी असा वाद उफाळून आला आहे. सरकारने त्रिभाषा सक्ती करण्याचा जीआर आणताच सगळीकडे याविरोधात तीव्र संतापाची लाट पसरली. महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी आली पाहिजे असं म्हणत अनेक अप्रिय घटनादेखील घडल्या. त्यावर अनेक कलाकार आणि राजकीय नेत्यांनी आपली मतं मांडली. आता यासगळ्यात अभिनेत्री केतकी चितळेने तिचं मत मांडलंय. अभिनेत्रीनं केलेलं मराठी भाषेबद्दलचं वादग्रस्त वक्तव्यसुद्धा सध्या चर्चेत आलंय. तिने एक व्हिडिओ शेअर केलाय जो शोष; मीडियावर चर्चेत आहे.