

KETKI MATEGAONKAR
ESAKAL
मराठमोळी अभिनेत्री 'केतकी माटेगावकर हिने तिच्या अभिनयासोबतच तिच्या आवाजानेदेखील प्रेक्षकांना भुरळ पाडली. केतकी तिच्या स्पष्टवक्तेपणाबद्दल ओळखली जाते. ती कायमच तिची सामाजिक मतं बिनधास्तपणे मांडताना दिसते. काही वर्षांपूर्वी केतकीने स्वतःचं घर खरेदी केलं होतं. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत केतकीने लग्नाबद्दल तिचं मत सांगितलंय. भारतात विवाह म्हणजे दोन कुटुंबांचं एकत्र येणं मानलं जातं. मात्र ते त्यापेक्षा दोन व्यक्तींचं एकत्र येणं जास्त आहे असं तिचं मत आहे. त्यामागचं कारणही तिने स्पष्ट केलं.