Ajintha Verul Film Festival 2025 : ‘खडमोड’ हा चित्रपट जंगलतोडीच्या परिणामाचे वाइल्ड लाइफवर होणारे दुष्परिणाम आणि ग्रामीण जीवनातील संघर्ष प्रभावीपणे उलगडतो. या चित्रपटात एका मुलाच्या माध्यमातून या समस्येचे वास्तववादी चित्रण करण्यात आले आहे.
मानवाने जंगलतोड करून अतिक्रमण केले आहे, ज्याचे दुष्परिणाम दिसू लागले आहेत. भविष्यात हे सावट आणखी गडद होणार असल्याचे संकेत ‘खडमोड’ या चित्रपटाच्या माध्यमातून दिले आहेत. ‘खडमोड’ हा शब्द प्रामुख्याने नंदूरबार भागातील आहे.