सोशल मीडियावर सतत चर्चेत असलेली अभिनेत्री खुशी मुखर्जीने पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. लहान कपडे घालून सतत ट्रोल होणाऱ्या खुशीनं अलीकडेच एका मुलाखतीत असा दावा केला आहे की, तिनं स्वतःच्या अॅपवरून फोटो आणि व्हिडिओ विकून फक्त दोन महिन्यात तब्बल 10 कोटी कमावले आहेत.