मनोरंजन विश्वात 'मेट गाला' सोहळ्याची जोरदार चर्चा सुरुये. या सोहळ्यात अनेक सेलिब्रिटी मेट गाला रेड कार्पेटवर उपस्थित होते. दरम्यान या सोहळ्यात खास आकर्षण ठरली कियारा आडवाणी. कियाराने या सोहळ्यासाठी एक खास ड्रेस तयार करुन घेतला होता. तिचा तो खास लूक सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.