
'नटरंग', 'फॅन्ड्री', 'जोगवा', 'जारण' यासारख्या चित्रपटांमधून प्रेक्षकांना वेड लावणारे लोकप्रिय मराठी अभिनेते किशोर कदम उत्कृष्ट कवी आहेत. त्यांच्या कवितांमुळे त्यांना सौमित्र म्हणूनही ओळखलं जातं. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत अतिशय उत्तमोत्तम चित्रपट दिलेत. मात्र त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात त्यांना परवड सहन करावी लागतेय. त्यांच्या सोसायटीचे कमिटी मेम्बर्स आणि बिल्डर यांनी मिळून त्यांचं चांगलं रहात घ झोपडपट्टी घोषित करून त्यांची इमारत पाडून त्याजागी दुसरी इमारत बांधण्याचा घाट घातलाय. याविरोधात आवाज उठवल्याने त्यांना सोसायटीच्या इतर मेम्बर्सनी चक्क वाळीत टाकण्याचा प्रकार घडलाय.