
Nausheen Ali Saradar : हिंदी टेलिव्हिजन अभिनेत्री नौशीन अली सरदारबाबत एक धक्कादायक प्रकार घडला. काही दिवसांपूर्वी नौशीनच्या मोठ्या भावाचं निधन झालं पण सेटवरील नो मोबाईल पॉलिसीमुळे तिला ही बातमी वेळेत समजली नाही आणि त्यामुळे ती घरी वेळेत पोहोचू शकली नाही. सध्या नौशीन वसुधा या मालिकेत काम करतेय. तिथे हा प्रकार घडला.