
छोट्या पडद्यावर गेल्या काही महिन्यात अनेक मालिका सुरू झाल्या. त्यातलीच एक मालिका म्हणजे 'कोण होतीस तू काय झालीस तू'. या मालिकेने फार कमी वेळात प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं. २८ एप्रिलपासून सुरू झालेली ही मालिका टीआरपी यादीत ७व्या क्रमांकावर आहे. या मालिकेत गिरीजा प्रभू, मंदार जाधव, सुकन्या मोने तसंच साक्षी गांधी यांसारख्या कलाकारांची मुख्य भूमिका आहे. सध्या या मालिकेत कावेरी आणि यश यांच्या प्रेमाची सुरुवात होताना दिसतेय. यश कावेरीसमोर त्याच्या प्रेमाची कबुली देणार आहे. मात्र त्यातच आता त्यांच्या आयुष्यात नवं वादळ येणार आहे.