
ONKAR BHOJANE
ESAKAL
ओंकार भोजने हे नाव घेतलं की अनेकांचे कान टवकारतात. कारण त्याचा अभिनय आणि कामाप्रतीची निष्ठा. त्याचे चाहते प्रचंड आहेत. कोकणाच्या मातीतला एक अस्सल हिरा असलेला ओंकार 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' मधून प्रेक्षकांच्या भेटीला आला. त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांना खळखळून हसायला भाग पाडलं. आपल्या अभिनयाच्या जोरावर त्याने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं. त्याने हास्यजत्रेत साकारलेलं प्रत्येक पात्र आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. मात्र काही वर्षांपूर्वी त्याने हास्यजत्रेचा निरोप घेतला. आता ओंकार हास्यजत्रेत परत येणार असल्याचं समोर आलं आहे.