

KRANTI REDKAR DAUGHTERS
ESAKAL
छोट्या आणि मोठ्या पडद्यावर आपल्या अभिनयाची जादू दाखवणारी लोकप्रिय अभिनेत्री क्रांती रेडकर हिने निर्माती म्हणूनही आपली भूमिका पार पडलीये. तिने अनेक गाजलेल्या सिनेमात काम केलं. मात्र 'कोंबडी पळाली' या 'जत्रा' सिनेमातील भूमिकेने तिला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. क्रांती सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. ती कायमच तिचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. मात्र यासोबतच ती तिच्या मुली छबिल आणि गोदो यांचे किस्सेही चाहत्यांना सांगत असते. चाहतेही हे किस्से एन्जॉय करतात. मात्र तिने कधीही तिच्या मुलींचे चेहरे चाहत्यांना दाखवले नव्हते. आता अखेर छबिल आणि गोदो यांचे चेहरे प्रेक्षकांसमोर आलेत.