

kranti redkar
esakal
मराठमोळी अभिनेत्री क्रांती रेडकर हिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. तिला 'कोंबडी पळाली' या गाण्यातून लोकप्रियता मिळाली. क्रांती कायम सोशल मीडियावर सक्रीय असते. मात्र ती सगळ्यात जास्त चर्चेत आली होती जेव्हा तिचे पती समीर वानखेडे यांनी एनसीबीचे माजी प्रमुख असताना शाहरुख खान याच्या मुलाला अटक केली होती. नंतर काही महिन्यांनी समीर वानखेडेंवर लाच मागितल्याचा आरोप झाला. नंतर त्यांच्या जातीवरूनही प्रश्न उपस्थित झाले होते. तेव्हा क्रांती पतीच्या मागे धीटपणे उभी राहिली. मात्र आता या कठीण काळात तिच्यासोबत इंडस्ट्रीमधील कोण कोण होतं याबद्दल तिने सांगितलं आहे.