

krushanaichya leki
esakal
छोट्या पडद्यावर येत्या काही दिवसात अनेक मराठी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यातली एक म्हणजे 'कृष्णाईच्या लेकी'. येत्या १५ जूनपासून ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात लोकप्रिय अभिनेत्री निवेदिता सराफ मुख्य भूमिकेत दिसतायत. या मालिकेत निवेदिता कृष्णाईच्या भूमिकेत दिसतायत. तर त्यांना तीन मुलीची आहेत. शारदा, गौरी आणि सौदामिनी अशी त्यांची नावं. मात्र या मुली कृष्णाईचं ओझं नसून तिचा स्वाभिमान आहेत. जिथे नायिका आहेत तिथे खलनायिकादेखील असायलाच हव्यात. आता या मालिकेत खलनायिका साकारणाऱ्या अभिनेत्रींचे चेहरे समोर आलेत.