धनुष आणि रश्मिका मंदाना हे कुबेरा चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात नागार्जुनची सुद्धा महत्त्वाची भूमिका आहे. नुकताच या सिनेमाचा इव्हेंट पार पडला. यावेळी धनुष आणि रश्मिका यांनी शुटिंगचे काही किस्से चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. यावेळी धनुषने एका सीनची आठवण करुन दिली. तो म्हणाला की, ' एका सीनसाठी आम्ही दोघेही 6 ते 7 तास कचऱ्याच्या डब्यात होता.'