
प्रसिद्ध गायक कुमार सानू यांनी आपल्या आवाजाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं. मात्र त्यांच्या गाण्यांसोबतच त्यांचं वैयक्तिक आयुष्यही चर्चेत राहिलं. त्यांचे अभिनेत्री कुनिका सदानंदनसोबत विवाहबाह्य संबंध होते. काही महिन्यांपूर्वी एका मुलाखतीत कुनिकाने हे कबूल केलं होतं. आता ती पुन्हा एकदा याबद्दल बोलली आहे. कुनिका सदानंद हिच्या म्हणण्यानुसार, एकदा कुमार सानू दारू पिऊन हॉटेलच्या खिडकीतून उडी मारणार होते तर एकदा त्यांच्या पत्नीने हॉकी स्टिकने अभिनेत्रीची गाडी फोडली. एवढेच नाही तर ती त्यांच्या घराबाहेर येऊन ओरडायची.