
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक काव्यातून टीका करणाऱ्या कॉमेडियन कुणाल कामराने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतलीय. त्याने मुंबई पोलिसांकडून दाखल करण्यात आलेली एफआयआर रद्द करावी अशी मागणी केलीय. एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना कुणाल कामराने गद्दार शब्द वापरला होता. त्यानंतर आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी ज्या ठिकाणी कार्यक्रमाचं शूटिंग झालं होतं त्या स्टुडिओची तोडफोड करत इशारा दिला होता.