
गेल्या काही वर्षांत तंत्रज्ञान, दळणवळण, आर्थिक स्थिती, शिक्षणात झालेल्या बदलांसह नव्या पिढीच्या आशा-आकांक्षाही बदलल्या आहेत. ग्रामीण भागातील तरुणांच्या मानसिकतेचा वेध घेत एका लग्नाची रंजक गोष्ट 'कुर्ला टू वेंगुर्ला' या चित्रपटातून उलगडणार आहे. अभिनेता प्रल्हाद कुडतरकर, वीणा जामकर, वैभव मांगले या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार असून, हा चित्रपट १९ सप्टेंबरपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.