

apara mehta
esakal
'क्योंकि सास भी कभी बहू थी' आणि 'जमाई राजा' सारख्या मालिकांमधून घराघरात पोहोचलेल्या लोकप्रिय अभिनेत्री अपरा मेहता सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. त्यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांचे पती आणि अभिनेते दर्शन जरीवाला यांनी त्यांचा केलेला अपमान आणि त्यांच्या नात्याबद्दल सांगितलं. ते दोघे गेले २३ वर्ष वेगळे राहत आहेत. दर्शन एक दिवस अचानक घर सोडून निघून गेले असं त्यांनी सांगितलं.