लग्नानंतर होईलच प्रेम' मधून मुख्य कलाकाराची एक्झिट? अनेक भागात, प्रोमोत न दिसल्याने सोशल मीडियावर चर्चा

MAIN ACTOR LEAVE LAGNANATAR HOILACH PREM SERIAL: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'लग्नानंतर होईलच प्रेम' मधून एका अभिनेत्याने एक्झिट घेतली असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्यात. कोण आहे तो कलाकार?
LAGNANATAR HOILACH PREM ACTOR EXIT

LAGNANATAR HOILACH PREM ACTOR EXIT

ESAKAL

Updated on: 

छोट्या पडद्यावरील मालिका या प्रेक्षकांच्या अत्यंत आवडत्या असतात. टीआरपी यादीत स्थान मिळवण्यासाठी मालिकेत निरनिराळे ट्विस्ट आणले जातात. या मालिकांमधील पात्रदेखील त्यांची आवडती असतात. अशातच मालिकेतील एखादं पात्र जरी बदललं तरी ते प्रेक्षकांना खटकतं. मालिकेमध्ये झालेला बदलही त्यांना लगेच जाणवतो. 'लग्नानंतर होईलच प्रेम' या मालिकेत देखील असाच एक बदल प्रेक्षकांना जाणवलाय. या मालिकेतील मुख्य कलाकारांपैकी एक कलाकार बरेच दिवस मालिकेतून गायब आहे. आणि प्रेक्षक आता त्याच्याबद्दल विचारणा करत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com