Lagnacha Shot Song Out
esakal
Premier
प्रेमाच्या रेशमी धाग्यात गुंफली अभि–कृतिकाची केमिस्ट्री! ‘लग्नाचा शॉट’मधील नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला
Lagnacha Shot Song Out : लग्नाचा शॉट सिनेमाचं नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आलं. जाणून घेऊया या सिनेमाविषयी आणि गाण्याविषयी.
Marathi Entertainment News : मराठी चित्रपटसृष्टीत लव्हस्टोरीचा नवा रंग भरण्यासाठी आगामी चित्रपट ‘लग्नाचा शॉट’ सज्ज झाला असून चित्रपटातील अभिजीत आमकर व प्रियदर्शिनी इंदलकर या नव्या जोडीची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. आता या चित्रपटातील ‘रेशमी बंध’ हे रोमँटिक गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या गाण्यात या फ्रेश जोडीची केमिस्ट्री पाहायला मिळते. प्रदर्शित होताच या गाण्याने आपल्या हळव्या सुरांमुळे आणि मनाला भिडणाऱ्या दृश्यांमुळे प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

