

Lagnacha Shot Title Song Out
esakal
Marathi Entertainment News : काही दिवसांपूर्वीच ‘लग्नाचा शॉट’ चित्रपटाचा धमाल टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला. टीझरला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर आता चित्रपटातील टायटल साँग ‘लग्नाचा शॉट’ प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. अभि आणि कृतिकाच्या केळवणानंतर त्यांच्या हळदीचा जल्लोष या गाण्यात रंगताना दिसतोय. सगळीकडे नाच, गाणी, हळदीची धमाल, मज्जा सुरू असतानाच नवरदेव अभि मात्र खुश नसल्याचे जाणवतेय. ‘डोक्याला ताप झाला लग्नाचा शॉट!’ असे म्हणत अभिचा गोंधळ आणि लग्नाची भीती या गाण्यात मजेशीर पद्धतीने मांडण्यात आली आहे.