

LAGNANATR HOILCH PREM
ESAKAL
'लग्नानंतर होईलच प्रेम' या मालिकेत आता सगळ्यात मोठा ट्विस्ट आला आहे. काव्या आणि जीवा यांच्याबद्दल सगळ्यांना अखेर माहीत पडलंय. पण ज्याची भीती होती तेच घडलंय. काव्या आणि जीवा यांच्याबद्दल समजल्यानंतर पार्थ आणि नंदिनी पूर्णपणे तुटले आहेत. आधीच या चारही जणांची लग्न अत्यंत बिकट परिस्थितीत झाली होती. मात्र त्यानंतर त्यांनी आपापलं नशीब स्वीकारून नव्याने आयुष्याची सुरुवात करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आत्याबाईंच्या कारस्थानामुळे आता या चौघांचे संसार मोडणार आहेत. २० डिसेंबरच्या भागात 'लग्नानंतर होईलच प्रेम' मध्ये काय घडणार ते पाहूया.