

lagnanatar hoilch prem
esakal
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम 'लग्नानंतर होईलच प्रेम' मध्ये सध्या मोठा ड्रामा सुरू आहे. एकीकडे काव्या आणि जीवा यांच्या नात्याचं सत्य समोर आल्याने नंदिनी आणि पार्थ चांगलेच खचलेत तर दुसरीकडे मात्र मानिनी तिच्या सुनेच्या बाजूने उभी राहणार आहे. या मालिकेच्या आजच्या भागात जीवा आणि काव्याचं अफेअर समोर आल्यावर नंदिनीला खूप दुःख झाल्याचं दाखवण्यात येणार आहे. नंदिनी त्या दोघांना म्हणते, 'तुम्ही एकत्र या, मी तुमचं लग्न लावून देईन.' तेव्हा जीवा सांगतो, काव्या आणि त्याच्यात आता काहीही उरलेलं नाही. तो म्हणतो, 'काव्यावर होतं त्यापेक्षा कित्येक पटींनी जास्त, माझं तुझ्यावर प्रेम आहे.' तेव्हा नंदिनी जीवाची कॉलर पकडून विचारते की, तो अजून किती खोटं बोलणार आहे?