
'लग्नानंतर होईलच प्रेम ही छोट्या पडद्यावरील मालिका सध्या प्रेक्षकांची मनं जिंकतेय. या मालिकेने फार कमी कालावधीत प्रेक्षकांना आपलंसं केलंय. मालिकेत येणाऱ्या वेगवेगळ्या ट्विस्टमुळे प्रेक्षकही मालिकेत गुंतले आहेत. तर मालिकेतील दोन्ही जोड्या म्हणजेच पार्थ आणि काव्या व जीवा आणि नंदिनी प्रेक्षकांच्या लाडक्या झाल्या आहेत. एकीकडे त्यांच्या लग्नात झालेली गडबड आहे तर दुसरीकडे त्यांचं लग्नानंतरचं आयुष्य आहे. आता मालिकेत आणखी एक नवा ट्रॅक सुरू होतोय. या ट्रॅकमुळे नंदिनी आणि जीवा यांच्यात मैत्री होणार का असा प्रसन्न प्रेक्षकांना पडलाय. असं नेमकं काय घडलंय?