
sanyogita bhave
esakal
लोकप्रिय मराठी मालिका 'लग्नानंतर होईलच प्रेम' या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर गारुड घातलंय. या मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या आवडीचं आहे. पार्थ- नंदिनी, जिवा आणि काव्या यांच्या जोड्या प्रेक्षकांच्या आवडीच्या असल्या तरी एक व्यक्ती आहे जिचा प्रेक्षक रागराग करतात. ती व्यक्ती म्हणजे त्यांची आत्या. मालिकेत ही भूमिका अभिनेत्री संयोगिता भावे साकारत आहेत. मालिकेत जरी खडूस आणि वाईट भूमिकेत असल्या तरी खऱ्या आयुष्यात त्या अतिशय चांगल्या आहेत. त्यांनी अनेक मालिका आणि चित्रपटात काम केलंय. त्यांनी चक्क बॉलिवूड अभिनेत्री रेखा यांच्यासोबतही काम केलंय. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी रेखासोबतचा त्यांचा अनुभव सांगितलाय.