लक्ष्मी निवास मालिकेत सध्या अनेक ट्विस्ट येताना पहायला मिळताय. अखेर सिद्धू भावनासोबत असलेल्या नात्याबद्दल सगळ्यांना सांगतो. भावनाच्या गळ्यात मीच मंगळसूत्र घातल्याचं म्हणत भावनाच माझी बायको असल्याची कबुली तो देतो. दरम्यान आता मालिकेत नवीन ट्विस्ट आलेलं पहायला मिळतय.