
DISALA GA BAI DISALA CONTROVERSY
ESAKAL
एक तो काळ होता जेव्हा अशी मराठी आणि हिंदी गाणी बनायची जी ऐकून प्रेक्षकांना ती आपल्याच आयुष्यावर आधारित आहेत असं वाटायचं. काही गाणी मनोरंजन करायची तर काही थेट प्रेक्षकांच्या काळजावर वार करायची. त्यानंतर काळ आला तो लावण्यांचा. मराठी लावण्यांनी आणि प्रेमगीतांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलं. मात्र सध्या अनेक चांगल्या गाण्यांचं वाटोळं होताना दिसतंय. अनेकजण रिमेकच्या नावाखाली जुन्या गाण्यांची वाट लावतायत. हिंदी मध्ये हे सर्रास होत होतं. मात्र आता मराठीतही ती लाट आलीये. ललित प्रभाकरच्या आगामी चित्रपटात 'दिसला गं बाई दिसला' या गाण्याचा रिमेक करण्यात आलाय. मात्र हा रिमेक पाहून प्रेक्षकांनी डोक्याला हात लावलाय.