

Super Duper Teaser Out
esakal
Marathi Entertainment News : झी स्टुडिओज प्रस्तुत ‘सुपर डुपर’ या बहुचर्चित मल्टिस्टारर आणि कौटुंबिक महासोहळ्याच्या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांची उत्सुकता आता चांगलीच शिगेला पोहोचली आहे. पोस्टरपासूनच या चित्रपटाची चर्चा रंगली होती आणि आता या टीझरने त्या उत्सुकतेत आणखी भर घातली आहे. यंदाच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमधील ही खास मनोरंजनाची मेजवानी ठरणार असून, भव्यदिव्य स्टारकास्ट असलेला हा कौटुंबिक सिनेमा ३ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत संपूर्ण कुटुंबाने एकत्र येऊन अनुभवावा, असा हा चित्रपट असल्याची झलक टीझर देतो.