
saif ali khan
esakal
विशाल भारद्वाज दिग्दर्शित ‘ओमकारा’ या २००६ मधील चित्रपटात सैफ अली खानने साकारलेला ‘लंगडा त्यागी’ हा खलनायक आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. या भूमिकेतील त्याचा अभिनय ही त्याच्या कारकिर्दीतील महत्त्वाची नोंद मानली जाते. आता जवळपास दोन दशकांनंतर पुन्हा एकदा या पात्राला नव्या रूपात प्रेक्षकांसमोर आणण्याची तयारी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. निर्माते कुमार मंगत पाठक आणि अभिषेक पाठक यांनी ‘लंगडा त्यागी’वर आधारित स्वतंत्र चित्रपट करण्याचा निर्णय घेतला आहे.