
LAPANDAV
ESAKAL
छोट्या पडद्यावर गेल्या काही दिवसात अनेक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. यातील काहीमालिकांनी प्रेक्षकांची मनं जिंकली तर काही अजूनही त्यासाठी प्रयत्न करताना दिसतायत. त्यात स्टार प्रवाहावरही दोन नव्या मालिका सुरू झाल्या. यात 'लपंडाव' मालिकेचादेखील समावेश आहे. नुकताच या मालिकेचा प्रोमो समोर आला आहे. यात दाखवलेला सीन पाहून प्रेक्षकांनीच डोक्याला हात लावलाय. हा सीन 'सैयारा' चित्रपटातून घेण्यात आल्याचं प्रेक्षक सांगत आहेत.