
LAST STOP KHANDA
ESAKAL
सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' चित्रपटातलं 'शालू झोका दे गो मैना' हे गाणं लोकप्रिय झालं आहे. प्रत्येकाच्या प्रेमाची गोष्ट उलगडणाऱ्या या चित्रपटातून अभिनेता श्रमेश बेटकर, जुईली टेमकर ही नवी जोडी प्रेक्षकांसमोर येणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर लाँच करण्यात आले असून येत्या २१ नोव्हेंबरला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.