
Bollywood News : भारताच्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा आज तिसरा स्मृतिदिन. 6 फेब्रुवारी 2022 ला लता मंगेशकर यांचे वयाच्या 92 व्या वर्षी निधन झालं. भारतातील जवळपास सर्व भाषांमध्ये लता मंगेशकर यांनी गाणी गायली. त्यांच्या सुमधुर आवाजामुळे आणि सुरेल स्वरांमुळे अनेकांनी त्यांना देवी सरस्वतीचा दर्जा दिला. पण तुम्हाला माहितीये का? लता यांनी सिनेविश्वात पदार्पण गायिका म्हणून नाही तर अभिनेत्री म्हणून केलं.