
भारताच्या प्रत्येक स्वातंत्र्यदिनी ठिकठिकाणी आवर्जून वाजणारं गाणं म्हणजे 'ए मेरे वतन के लोगो'. या गाण्याची मोहिनी आजही प्रेक्षकांवर आहे. हे गाणं आणि त्यातील गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा आवाज आजही आपले डोळे ओले करतो. भारत पाक युद्धादरम्यानची सीमेवरील सैनिकांची परिस्थिती सांगणारं हे गाणं आजही प्रेक्षकांच्या मनाच्या खूप जवळ आहे. कवि पंडित प्रदीप यांचे शब्द, सी. रामचंद्र यांचे संगीत आणि लता दीदींचा दैवी स्वर या गाण्याला लाभला आहे. मात्र या गाण्यामागची गोष्ट अगदीच वेगळी आहे.