
Bollywood Entertainment News : सन ऑफ सरदार फेम अभिनेता मुकुल देवचं आज निधन झालं. वयाच्या 52 व्या वर्षी मुकुलने अखेरचा श्वास घेतला. त्याच्या निधनाचं कारण अजून समजू शकलं नाहीये. पण त्याच्या अचानक जाण्याने बॉलिवूडकरांना खूप मोठा धक्का बसला. बॉलिवूडमधील उत्तम अभिनेत्यांपैकी एक असलेल्या मुकुलने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती.