

laxmichya pavlani
esakal
'लक्ष्मीच्या पावलांनी' ही मालिका संपायला अगदी दोन दिवस बाकी आहेत. मात्र या मालिकेमुळे स्टार प्रवाहवर प्रेक्षक चांगलेच नाराज झालेत. २० नोव्हेंबर २०२३ रोजी ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. अतिशय अशा मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली. ईशा केसकरने साकारलेली कला आणि अक्षर कोठारीचा अद्वैत प्रेक्षकांना भावला. सगळं काही व्यवस्थित सुरू असताना मालिकेचा टीआरपी अगदी तिसऱ्या क्रमांकावर असताना अचानक स्टार प्रवाहने ही मालिका बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता प्रेक्षक स्टार प्रवाहला जाब विचारत आहेत.