

ababa vithu bolu lagala
esakal
मराठी रंगभूमीवर सध्या जुन्या आणि गाजलेल्या नाटकांच्या पुनरागमनाचे वारे वाहत आहेत. मोठ्यांच्या नाटकांसोबतच आता बालरंगभूमीही पुन्हा कात टाकत आहे. याच पार्श्वभूमीवर, बालप्रेक्षकांचे प्रचंड मनोरंजन करण्यासाठी एकेकाळी गाजलेले ‘अबब विठोबा बोलू लागला’ हे सुपरहित बालनाट्य आता नव्या संचात रंगभूमीवर येण्यासाठी सज्ज झाले आहे.