
LAXMIKANT BERDE
ESAKAL
लोकप्रिय मराठी अभिनेले लक्ष्मीकांत बेर्डे म्हणजेच प्रेक्षकांचा लाडका लक्ष्या आजही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतोय. आपल्या अभिनयाच्या जोरावर घराघरात पोहोचलेले लक्ष्मीकांत यांनी त्यांची प्रत्येक भूमिका जिवंत केली. गिरगावात लहानाचे मोठे झालेले लक्ष्मीकांत यांनी खेतवाडीत आपल्या अभिनयाचा खऱ्या अर्थाने श्रीगणेशा केला. ते खेतवाडीतल्या युनियन हायस्कुलमध्ये शिकले. गिरगाव चौपाटीवरच्या भवन्स कॉलेजचे विद्यार्थी होते. त्यात गिरगावतला गणेशोत्सव म्हणजे अतिशय सुंदर. याच गणपतींच्या विसर्जनाला लक्ष्मीकांत देहभान विसरून नाचायचे.