
अभिनेत्री सुमन राणाने दाक्षिणात्य चित्रपटांतून काम केल्यानंतर आता ती ‘लेट्स मीट’च्या माध्यमातून हिंदी चित्रपटसृष्टीत झळकणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रवींद्र संधू यांनी केले असून, त्याची निर्मिती यूव्ही फिल्म्सच्या बॅनरखाली झाली आहे. हा चित्रपट ७ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे, त्यानिमित्त सुमन राणाशी साधलेला संवाद...