पोस्टरमध्ये नायक तनुज विरवानी (Tanuj Virwani) आणि नायिका रिया यांचे चेहरे न दाखवता त्यांना घराच्या खिडकीत उभे दाखवण्यात आले आहे.
Let’s Meet Hindi Movie Poster Released : इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या युगात मानवी नातेसंबंधांची व्याख्या बदलत चालली आहे. व्हर्च्युअल जगात जुळणाऱ्या नात्यांची गोष्ट सांगणाऱ्या 'लेट्स मीट' (Let's Meet Movie) या आगामी हिंदी चित्रपटाचे (Hindi Movies) पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले. आधुनिक काळातील नात्यांवर भाष्य करणाऱ्या या चित्रपटाची कथा आजच्या तरुण पिढीला नक्कीच भावेल, असे निर्माते आणि दिग्दर्शकांचे मत आहे.