

be dune teen
esakal
मराठी मनोरंजनासाठी उत्तम ठिकाण असलेल्या ZEE5 ने त्यांच्या आगामी ओरिजिनल वेब सीरिज 'बे दुणे तीन' चा ट्रेलर प्रदर्शित केला आहे. ही मालिका ०५ डिसेंबर २०२५ रोजी प्रीमियर होणार आहे. वृषांक प्रॉडक्शन्स निर्मित आणि अथर्व सौंदणकर व हिमांशू पिले यांनी दिग्दर्शित केलेला हा शो, पालकत्व पार पाडताना एका जोडप्याच्या आयुष्यातील मनाला भिडणाऱ्या, हसविणाऱ्या आणि अनपेक्षित गोष्टींच्या कथांच्या रूपात उलगडत जातो.